र्‍हुबार्ब चटणी

English version of this recipe can be found here - http://vadanikavalgheta.blogspot.com/2012/05/rhubarb-chutney.html

ही चटणीची रेसिपी निलोफर इचापोरीया किंग यांच्या '' मधून घेतली आहे. माझ्याकडे उपलब्ध असलेल्या सामानानुसार मी थोडेफार बदल केले आहेत. 

१/२ किलो र्‍हुबार्ब
१/४ किलो गूळ किंवा १ कप ब्राऊन शुगर
१/२ कप साखर
१/२ कप Cider Vinegar
१-१.५ टीस्पून लाल तिखट
२ टेबलस्पून आल्याच्या कापट्या (ज्युलियान कट)
४ लवंगा
२ २" लांब दालचिनीचे तुकडे
चवीप्रमाणे मीठ (१ ते १.५ टीस्पून)

Rhubarb Chutney

कृती -
र्‍हुबार्ब सोडून बाकीचे सगळे एका जड बुडाच्या स्टीलच्या पातेल्यात घ्यावे. आधी फक्त १ टीस्पून मीठ घालावे. मंद आचेवर सगळे एक उकळी यायला ठेवावे. दरम्यान र्‍हुबार्बचे मुळाकडचा आणि पानांचा भाग काढून टाकावा आणि फक्त दांडे घ्यावेत. स्वच्छ धुवुन साधारण १/४ इंची तुकडे करावेत. गरजेप्रमाणे मधोमध उभे कापावे. आता हे उकळत्या मिश्रणात घालावे आणि हलवत रहावे. चटणीत तुकडे मोठे रहावेत असे वाटले तर र्‍हुबार्बचे तुकडे बाजुला काढून पाक आटवावा. साधारण जॅम इतपत घट्ट झाले की र्‍हुबार्ब परत त्यात घालावा. एक उकळी आणली की बंद करावे. पूर्ण थंड होऊ द्यावे शेवटी चव घेऊन मीठ, तिखट गरज असेल तर घालावे. फ्रीजमधे ७-८ दिवस टिकते.

टीपा -
  1. र्‍हुबार्ब मिळत नसेल तर प्लम्स वापरून ही चटणी करता येते आणि ती पण मस्त लागते.
  2. पण त्यासाठी व्हिनेगर कमी घालावे (२ टेबस्पून वगैरे) आणि साधी साखर घालू नये फक्त गूळ घालावा.
  3. र्‍हुबार्ब असे दिसते आणि फक्त स्प्रिंगमध्ये मिळते.  

Comments

  1. मस्त फोटो! छान दिसतेय चटणी.

    ReplyDelete
  2. Rhurarb ला मराठीत नाव आहे का?

    ReplyDelete
  3. Thanks for the post! Reminds me that Rhubarb season here, and that chutney was definitely one of the most tantalizing things that I have ever made! I hope it wasn't beginner's luck and I can replicate that taste again.

    ReplyDelete
  4. मस्त
    तोंडाला पाणी सुटले.

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts