आळण

मी पाचवी-सहावीत असतानाची एक गंमत आहे. मी मावशीकडे रहायला गेलेले. अचानक मावशी-काकांना दुसर्‍या गावी जावे लागले. दोघी मावसबहीणी आणि मी असे घरी होतो. ताई मोठी होती थोडा पण स्वयंपाक करायची तेव्हा. मला पण थोडेफार काय काय करता येत होते. आम्ही रात्री पिठले भात करायचे असे ठरवले. मस्त पिठले केले गुठळ्या काढायच्या असतात हे आठवत होते. ते अगदी जंग जंग पछाडून केले. पिठले कसे मस्त लाल दिसले पाहिजे कारण मम्मी-मावशी-आज्जी करतात ते पिठले कसे मस्त लालचुटुक होते म्हणून मग आम्ही अजुन रंग नाही आला करत अजुन थोडे अजुन थोडे असे करत तिखट घालत गेलो. शेवटी जाऊदे असे करून सोडुन दिले. तोवर मला वाटते बरेच तिखत घालून झाले होते. भात तयार होताच, लगेच गरम गरम खाऊ म्हणुन ताटे लावून घेतली. पहिला घास घेतला आणि डोळ्यातून टचकन पाणी!! असे सॉलीड तिखट आयुष्यात कधी खाल्ले नव्हते. मग एक घास भात एक घास पाणी असे करत अजुन तीन चार घास पोटात ढकलले. पण पुढे काही ते तोंडात घालवेना. मग मिठाने तिखट कमी होते असे म्हणुन भरपूर मीठ घातले. पण ते समीकरणही काही घश्याखाली जाईना. मग परत पाणी, घास, असे करत करत ताट रिकामे केले. झाकपाक केली आणि गप झोपी गेलो. रात्री कधीतरी काका मावशी परत आले. सकाळी उठून मावशीला सगळी गंमत सांगितली. तिने पहिला प्रश्न केला - तूप घालून का खाल्ले नाही. दुसरा प्रश्न होता - घरात दही, दूध, लोणचे वगैरे सगळे असताना तसले तिखटजाळ पिठले तसेच खायची काय गरज होती!! आणि भाजीला रंग का आला नव्हता तर आम्ही नेहेमीचे तिखट न घालता मिरच्यांच्या बियांची पूड करून ठेवली होती ती घालत होतो. मला अजुनही पातळ पिठले करताना माझ्या ताईची आठवण येते.
ही साधी सोपी रेसिपी आहे माझ्या एका मैत्रिणीची. साधारण पातळ पिठल्यासारखाच हा प्रकार. मेथी/पालक/चकवतासारखी पालेभाजी घालून केलेला असल्याने अतिशय चविष्ट होतो. वरून लसणीची चरचरीत फोडणी आणि सोबत भाकरी असली की अगदी स्वर्गसुख!!

Alan


१ जुडी पालेभाजी ( निवडलेली पाने साधारण ५ - ६ कप व्हावीत )  
५ - ६ लसूण पाकळ्या
पाव ते अर्धा कप बेसन
लाल मिरची पावडर चवीप्रमाणे
१ टीस्पून गोडा मसाला
मीठ चवीप्रमाणे
फोडणीसाठी - तेल , जिरे , मोहरी , हिंग , कढीपत्ता , हळद
पाणी लागेल तसे

कृती - 
भाजी निवडून शक्यतो पाने पाने घ्यावीत. पाण्यात स्वच्छ धुवावीत आणि बारीक चिरुन घ्यावीत. बेसन पाण्यात कालवून घ्यावे. भजीच्या पिठाहून थोडे सरसरीत असावे. त्यातच चवीप्रमाणे मीठ, तिखट मिसळून घ्यावे. गोडा मसाला घालावा. जाड बुडाच्या कढईत तेलाची नेहेमी फोडणी करावी. ठेचलेला लसूण घालून थोडे परतून घ्यावे. चिरलेली भाजी थोडी परतावी. त्यावर भिजवलेले बेसन ओतावे. बारीक गॅसवर गुठळ्या न होऊ देता हलवावे.पाणी कमी झालेय असे वाटत असेल तर थोडे कोमट पाणी घालावे. झाकण ठेवुन भाजी नीट शिजवून घ्यावी. गरम गरम भाजी भात किंवा पोळी - भाकरीबरोबर खावी. हे साधारण पातळ पिठल्यासारखे असते.

शेवटी एका छोट्या कढईमध्ये 2-3 टेबलस्पून तेल तापवावे. त्यात 5-6 लसून पाकळ्या ठेचून/चिरून घालाव्यात. वरून 2 टीस्पून लाल तिखट आणि किंचित मीठ घालावे. वाढताना वाटीत भाजी घालून त्यावर हे तेल - लसूण घालून भाकरीबरोबर खावे.

टीपा - 
ही भाजी माझी मैत्रिण मेथीची करते. मला चंदनबटवा मिळला तेव्हा मी त्याचे करुन पाहिले मस्तच लागले. 
पालकाची पण अप्रतीम लागते.

Bookmark and Share

Comments

  1. Mast! Garam bhakri and alan, atach jevle aani hi comment :P

    ReplyDelete
  2. छान सोपी रेसिपी! आठवणसुद्धा मजेशीर आहे ;-)

    ReplyDelete
  3. आठवण आणि रेसिपी दोन्ही मस्तच....मी आणि ताईने असं एकदा पिठलं करताना इतकं पातळ केलं की आम्हालाच ते आवडलं नाही..आईसारखं घट्ट का नाही हे विचारलं तेव्हा कळलं की आई करते तो झुणका (पण घरात आम्ही सरसकट पिठाचं पिठलं असंच म्हणतोय..) तर हे आमचं काय ते रावण पिठलं का काय शेवटी शेजारच्या काकु धारवाडकडच्या असल्याने त्यांना जबरी आवडलं होतं...
    मस्त पोस्ट... :)

    ReplyDelete
  4. mastch. :) Aai hi bhaji chakavat kinva kandyachi pat ghaluna karate. far mast lagate .

    asheech besan ghaluna pavatyachya biyanchi bhajee pan karate .

    Seema

    ReplyDelete
  5. Mints, have you tried this with chard? I have a bunch and I want to do something different with it, but have never tried chard with anything other than dry sautes.

    ReplyDelete
  6. Thanks Anjali and Abhijit.

    अपर्णा, thank you for sharing your memory :)

    Seema, thank for additional choices. Pavatyache paN karun baghen. pavate adhi cooker la shijavun ghyayache ka?

    ET, I have tried it once. It tastes good too. Needs little more garlic. Try it, I think you will like it.

    ReplyDelete
  7. Is there any widget that enables translation of the marathi recipes? I think we are missing out on traditional recipes. Would be immensely helpful if there is a translation facility.

    ReplyDelete
    Replies
    1. Hi Radha, welcome here. I will see if I can find such a translation widget :)

      Delete
  8. ho pavate shijavun ghete. pan khup naahee shijavayache.

    Seema

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Seema, majhyakade frozen pavate aahet. w/e la karun pahate.

      Delete
  9. Hi Mints,

    I joined your blog today itself and I am loving it......thanks for the special assal marathi recipes.



    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts