ब्रोकोलीची भाजी
ही माझ्या मैत्रिणीची, सपनाची, रेसिपी आहे. करायला अगदी सोपी आहे आणि अतिशय सुंदर लागते.
पाव किलो (१/२ पाऊंड) ब्रोकोली
१ लहान कांदा
१-२ हिरव्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी जास्त)
३ टीस्पून उडदाची डाळ
१ टेबलस्पून तेल
चवीप्रमाणे मीठ
कृती -
ब्रोकोलीचे तुरे काढून घ्यावेत. दांडे कोवळे असतील तर साधारण १/२" जाडीचे तुकडे करून घ्यावेत.
कांदा बारीक चिरुन घ्यावा.
मिरच्यांचे उभे २-२ तुकडे करून घ्यावेत.
तेल तापवायला ठेवून त्यात उडीदडाळ घालून गुलबट रंगावर परतावी.
त्यात मिरच्या घालून किंचीत परताव्यात. बारीक चिरलेला कांदा नीट गुलबट रंगावर परतून घ्यावा.
त्यात आता ब्रोकोली घालून नीट परतावे. मीठ घालून हलवावे.
गॅस मंद करून झाकण घालून एक वाफ काढावी.
एकदा नीट मिसळून मग कढई गॅसवरून खाली उतरावी.
टिपा -

- ब्रोकोली अगदी किंचीतच शिजू द्यावी. जास्ती शिजवल्यास अजिबात चांगले लागत नाही.
- यात उडीदडाळ जास्त वापरायची आहे. डाळीची चव ब्रोकोलीबरोबर एकदम मस्त वाटते.
- आवडत असेल तर किंचीत सांबार मसाला भुरभुरावा.
Comments
Post a Comment
Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.